दिल्लीत अरविंद केजरीवाल पाच साल 'नायक'

शपथविधी सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करण्याचं आश्वासन दिल्लीकरांना दिलं. तसंच सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. त्याचबरोबर आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री लाल दिव्याची गाडी घेणार नसल्याची माहिती दिली. 

Updated: Feb 14, 2015, 06:52 PM IST
दिल्लीत अरविंद केजरीवाल पाच साल 'नायक' title=

नवी दिल्ली : शपथविधी सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करण्याचं आश्वासन दिल्लीकरांना दिलं. तसंच सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. त्याचबरोबर आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री लाल दिव्याची गाडी घेणार नसल्याची माहिती दिली. 

आपल्या भाषणात केजरीवाल यांनी दिल्लीत अहंकारामुळेच काँग्रेस, भाजपचा पराभव झाल्याचं म्हटलंय. तसंच आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी अहंकार न बाळगण्याचा सल्ला दिला. रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.

रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांच्या सन्मानार्थ पूर्ण दिल्लीत मशाल फिरवण्यात येत आहे. या मशालीला अरविंद केजरीवाल ज्योत नाव दिलं असून आपच्या प्रत्येक आमदारांची स्वाक्षरी या मशालीवर घेतली आहे. ही ज्योत केजरीवाल यांना देण्यात येणार आहे. तर रामलीला मैदानावर महात्मा गांधींचा पेहराव करून कुवेत इथून एनआरआय असलेले गोपालचंग्र अय्यंगार आले होते. खास केजरीवाल यांच्या आमंत्रणावरून ते आले होते. 

पाच साल केजरीवाल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.