कानपूर : अभाविपने आयोजित केलेल्या आंदोलनात, त्यांचाच कार्यकर्ता भाजला गेला आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात अभाविपने आंदोलन आयोजित केलं होतं, यात त्यांच्याच कार्यकर्त्याच्या कपड्याने पेट घेतला आणि किरकोळ जखमी झाला.
उपस्थित विद्यार्थ्यांनी लगेच त्याचे जळालेले कपडे काढून वाचवले. मात्र त्यात तो जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' म्हणणार नाही, असं वक्तव्य केल्याच्या विरोधात, हे आंदोलन करण्यात येत होतं. आंदोलनादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांचा पुतळा जाळण्यात आला. मात्र या आगीने अभाविपचा कार्यकर्ता भाजला गेला.