अभिषेक मिश्री हत्याकांड : छत्तीसगडमध्ये 'दृश्यम' सिनेमाचं कथानक प्रत्यक्षात...

छत्तीसगडमधल्या बहुचर्चित अशा अभिषेक मिश्रा हत्याकांडावरून पडदा आता उठलाय. या हत्येमागची कहाणी ऐकल्यानंतर पोलीसही सुन्न झाले. 

Updated: Dec 25, 2015, 04:19 PM IST
अभिषेक मिश्री हत्याकांड : छत्तीसगडमध्ये 'दृश्यम' सिनेमाचं कथानक प्रत्यक्षात...  title=

नवी दिल्ली : छत्तीसगडमधल्या बहुचर्चित अशा अभिषेक मिश्रा हत्याकांडावरून पडदा आता उठलाय. या हत्येमागची कहाणी ऐकल्यानंतर पोलीसही सुन्न झाले. 

२०० करोड रुपयांचा मालक असलेल्या अभिषेकच्या हत्येप्रकरणी त्याच्या माजी प्रेयसीला, तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला अटक करण्यात आलीय. ४४ दिवसांपासून गायब असलल्या अभिषेकचा मृतदेह छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या भिलाई इथल्या एका घरी सापडल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

का करण्यात आली अभिषेक हत्या...
दोन वर्षांपूर्वी किम्सी नावाची एक तरुणी अभिषेकच्या कॉलेजमध्ये काम करत होती. इथेच दोघांची ओळख झाली. त्यानंतर किम्सी विकास भिलाई याच्याशी विवाहबद्ध झाली. 

विवाहानंतरही संबंध कायम ठेवण्यासाठी अभिषेक किम्सीवर दबाव टाकत होता. ही गोष्ट तिनं आपल्या पतीला आणि सासऱ्याला सांगितल्यानंतर तिघांनी मिळून अभिषेकच्या खुनाचा कट रचला. 


इथे सापडला मृतदेह

कशी झाली हत्या...
किम्सीनं अभिषेकला एक दिवस फोन करून आपल्या घरी बोलावून घेतलं. तिच्या पतीनं आणि सासऱ्यानं अभिषेकच्या डोक्यात रॉडनं हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह आपल्याच दोन मजली घरासमोरच्या अंगणात सहा फूट खड्डा खोदून पुरला... आणि कुणाला संशय येऊ नये, यासाठी त्यावर एक कोबीचं झाडंही लावलं. 

परंतु, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि या हत्येचा उलगडा झाला. अभिषेक छत्तीसगडमधल्या सर्वात मोठ्या एज्युकेशन ग्रुप 'शंकराचार्य ग्रुप ऑफ कॉलेज'चा डायरेक्टर होता.