www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
गाझियाबादमधील कौशंबीत आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय. हिंदू रक्षा दलच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
प्रशांत भूषण यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा हल्ला केल्याचं बोललं जातंय.
हल्ला करणाऱ्या व्यक्तींच्या हातात झेंडे होते, त्यांनी आपच्या कार्यालयातील काचेच्या खिडक्या फोडल्याचं सांगितलं जात आहे.
वादग्रस्त वक्तव्याविरोधात हल्ला
आपचे ज्येष्ठ नेते प्रशातं भूषण यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या मुद्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, काश्मिरमध्ये लष्कराच्या तैनातीवर हे वक्तव्य होतं.
काश्मिरमध्ये लष्कर तैनात करण्यावर काश्मिरमध्ये जनमत चाचणी करण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य प्रशांत भूषण यांनी केलं होतं.
या वक्तव्यावर भाजपसह, हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र यानंतर आम आदर्मी पार्टीने स्पष्ट केलं होतं की, प्रशांत भूषण यांचं हे वैयक्तिक मत आहे, प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नसल्याचं आपने स्पष्ट केलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.