तुमचा विरोध आमिरच्या विधानांना बळकटीच देतोय - शरद पवार

आमिर खानच्या असहिष्णुतेच्या विधानाला होणारा विरोध म्हणजे त्याच्या विधानाला एक प्रकारे बळकटी देणारा असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

Updated: Nov 25, 2015, 04:43 PM IST
तुमचा विरोध आमिरच्या विधानांना बळकटीच देतोय - शरद पवार  title=

मुंबई : आमिर खानच्या असहिष्णुतेच्या विधानाला होणारा विरोध म्हणजे त्याच्या विधानाला एक प्रकारे बळकटी देणारा असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

देशात दादरीनंतर माजी लष्कर प्रमुख आणि आसामचे राज्यपाल यांनी केल्लेल्या विधानामुळे समाजातील काही वर्गात चिंता वाढली आहे असे सांगून येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात असहिष्णूतेच्या मुद्द्यावर चर्चा होईल असेही पवार यांनी सांगितलंय. 

अधिक वाचा - 'इडियट रणछोडदास'वर शिवसेनेचा हल्लाबोल!

घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरुन उत्तरप्रदेशमधील दादरीमध्ये जमावानं एका मुस्लिम व्यक्ती हत्या केल्याची घटना घडली होती. 

अधिक वाचा - अक्षय कुमार आमिरच्या वक्तव्यावर काय म्हणतोय...

'बिहार निवडणुकीच्याआधी सुरू झालेल्या असहिष्णुतेच्या मोहीमेमागे मोठं राजकारण आहे. ही मोहीम ज्या लोकांनी उघडली होती त्यांना या कामाचे पैसे दिले गेले' असा गंभीर आरोप माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केला होता. 

अधिक वाचा - आमिरचं जरा अतिच झालं - मिल्खा सिंह

तर, नुकतंच 'हिंदुस्तान हे केवळ हिंदूंसाठी आहे' असं वादग्रस्त विधान आसामचे राज्यपाल पी बी आचार्य यांनी केलंय. त्यांच्यावर चहूकडून टीका होतेय. 

अधिक वाचा - 'मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.