दिल्लीत झाडाला लटकलेला मिळाला अल्पवयीन मुलाचा मृतदेह

दिल्लीच्या केशवपुरम भागात झाडाला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह लटकलेला आढळला. सकाळी 7 ची घटना आहे. मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. पार्कमध्ये फिरायला गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून त्याबद्दल माहिती दिली. 

Updated: May 5, 2015, 08:29 PM IST
दिल्लीत झाडाला लटकलेला मिळाला अल्पवयीन मुलाचा मृतदेह title=

नवी दिल्ली: दिल्लीच्या केशवपुरम भागात झाडाला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह लटकलेला आढळला. सकाळी 7 ची घटना आहे. मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. पार्कमध्ये फिरायला गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून त्याबद्दल माहिती दिली. 

केशवपुरम स्टेशन पोलीस तपास करत आहेत. परिसरातील प्रसिद्ध म्यूजिक फाउंटन पार्कमध्ये सकाळी अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. सुरुवातीच्या चौकशीत प्रकरण आत्महत्येचं वाटत असल्याचं पोलिसांना वाटतं. पण पोलिसांनी हत्या आणि आत्महत्या दोन्हीच्या बाजूनं तपास सुरू केलाय. 

लोकवस्तीत असलेल्या पार्कमध्ये अशा पद्धतीनं झाड़ावर मृतदेह सापडल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. तसंच पार्कमध्ये चौकीदार आणि माळी असतांनाही अशी घटना कशी घडली, यावरही आश्चर्य व्यक्त केलं जातंय.   

अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून तरुण एखाद्या मजूराचा मुलगा असल्याचं वाटतंय. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.