पणजी : अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत.
स्थानिक प्रशासनानं नौदलाकडे रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत मागितल्यानंतर या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय नौसेनेनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय.
नेव्हीचे चार जहाज पर्यटकांना वाचवण्यासाठी इथं दाखल झालेत. अडकलेल्या पर्यटकांना हॅवलॉकहून अंदमानपर्यंत सुखरुप आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बंगालच्या खाडीत सायक्लोनच्या कारणामुळे अंदमानात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटकांना हॅवलॉकहून पोर्टब्लेअरला हलवण्यात येईल. पावसामुळे, विमान वाहतूकही ठप्प आहे.
अंदमान - निकोबार बेटावर पुढच्या ४८ तासांपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय.