पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सांबामधील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका 19 वर्षीय तरुणीसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगढ सेक्टरमधील 19 वर्षीय तरुणी आणि राजौरीतील पानीयारीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Updated: Nov 1, 2016, 02:20 PM IST
पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू title=

जम्मू-काश्मीर : सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सांबामधील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका 19 वर्षीय तरुणीसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगढ सेक्टरमधील 19 वर्षीय तरुणी आणि राजौरीतील पानीयारीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या या आगळीकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. पहाटे पाच वाजल्यापासून पाकिस्तानने गोळीबार सुरु केला आहे. जम्मू काश्मीरमधील अर्निया सेक्टरमधील गोळीबारात 3 नागरिक जखमी झालेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.