टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले 62 लाख

500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काळ्यापैसा बाळगणाऱ्या लोकांचा पैसा पांढरा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे काही लोक आपला काळापैसा गटरांमध्ये तसेच गंगा नदीत फेकुन देण्याच्या ताजा घटना पुढे आल्या, तर दुसरीकडे काहीजण कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसा जमा करत असल्याच्या घटना घडत आहेत.

Updated: Nov 16, 2016, 04:48 PM IST
टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले 62 लाख title=

अलाहाबाद : 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काळ्यापैसा बाळगणाऱ्या लोकांचा पैसा पांढरा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे काही लोक आपला काळापैसा गटरांमध्ये तसेच गंगा नदीत फेकुन देण्याच्या ताजा घटना पुढे आल्या, तर दुसरीकडे काहीजण कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसा जमा करत असल्याच्या घटना घडत आहेत.

अलाहाबादमधील प्रतापगड सीमा भागात असाच एक प्रकार घडला आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरच्या अकाउंटमध्ये चक्क 62 लाख रूपये जमा झाले आहे. त्याला समजत नव्हते की, या प्रसंगी आनंदी होऊ की, दु;ख व्यक्त करू. लखपती होण्याच्या नादात जर ही बातमी त्याने लपवून ठेवली असती तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागलं असतं. पण सदर घटनेची माहिती टॅक्सी ड्रायव्हरने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये लिखीत स्वरूपात नोंदवण्यात आली आहे. पोलीस कारवाईनंतर चौकशीस सुरूवात झाली आणि त्यानंतर बँकेकडून टॅक्सी ड्रायव्हरचे खात गोठण्यात आलं आहे.