वृंदावनमध्ये माकडानं पाडला दीड लाखांचा पाऊस

पैशांचा पाऊस... स्वप्न नाही सत्य आहे... पण तो पाडला एका माकडानं... शनिवारी वृंदावन इथं हेच दृश्य पाहायला मिळाल. मुंबईकर हेमवती सोनकर यांच्यावर दीड लाखांचा पाऊस पडला.

Updated: Jul 20, 2015, 05:00 PM IST
वृंदावनमध्ये माकडानं पाडला दीड लाखांचा पाऊस title=

आग्रा: पैशांचा पाऊस... स्वप्न नाही सत्य आहे... पण तो पाडला एका माकडानं... शनिवारी वृंदावन इथं हेच दृश्य पाहायला मिळाल. मुंबईकर हेमवती सोनकर यांच्यावर दीड लाखांचा पाऊस पडला.

सोनकर कुटुंबिय वृंदावनला देवदर्शनासाठी गेल्या असता बाजारपेठेत खरेदी करत होत्या. मात्र एका माकडानं त्यांची पर्स हिसकावली आली पळून एका दुकानावर जाऊन बसला. माकडानं पर्स उघडून पाहिली... काही खायचं दिसलं नाही तर पर्स उडवून दिली. पर्समध्ये ५००-५०० च्या नोटांचे तीन बंडल म्हणजे तब्बल दीड लाख रुपये होते. जे हवेत उडाले... 

मग काय माकडानं केलेल्या पैशांचा पाऊस झेलायला लोकांची धावाधाव... काही जणांनी सोनकर कुटुंबियांना त्यांचे पैसे परत केले तर काहींनी पोबारा केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.