पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार

उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय. 

Updated: May 13, 2016, 12:15 PM IST
पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार title=

नवी दिल्ली : उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय. 

भलस्वा डेअरी भागात हे मंदिर आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी यासंबंधात ४५ वर्षीय पुजाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केलीय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

घटना कशी झाली उघड

आईसोबत मंदिरात गेली असताना मंदिरातील पुजाऱ्यानं तिला एकांत स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

चिमुडीनं पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिच्या आईला या घटनेसंबंधी शंका आली. याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर मुलीचं काऊन्सिलिंग करण्यात आलं. आरोपी पुजारी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.