१२ वी उत्तीर्णांसाठी लष्करात भर्ती

देशाची सेवा करण्यासाठी आर्मीमध्ये भर्ती होण्यासाठी चांगली संधी चालून आलीये. भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलात विविध पदांवर भर्तीसाठी प्रवेश परीक्षा फॉर्म जारी केलेत. 

Updated: Jan 6, 2016, 11:21 AM IST
१२ वी उत्तीर्णांसाठी लष्करात भर्ती title=

नवी दिल्ली : देशाची सेवा करण्यासाठी आर्मीमध्ये भर्ती होण्यासाठी चांगली संधी चालून आलीये. भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलात विविध पदांवर भर्तीसाठी प्रवेश परीक्षा फॉर्म जारी केलेत. 

एकूण रिक्त पदांची संख्या ३७५ इतकी आहे. लष्करात आणि हवाई दलांत एकूण ३२० जागांवर पदे रिक्त आहेत तर नौदलात ५५ पदे रिक्त आहेत. 

लष्करात भर्ती होण्यासाठी १२ वी पास अनिवार्य आहे. तसेच नौदल आणि हवाईदलातील प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

निवेदन करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९७ ते एक जुलै २०००दरम्यान असायला हवा. या पदांसाठी केवळ अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी ऑनलाई फॉर्म भरू शकता. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी यूपीएससीच्या वेबासाईटला भेट द्यावी.