नवी दिल्ली : काही दिवसांपासून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला होता. आता तर चक्क त्यांच्या विधानसभा क्षेत्र असलेल्या अमेठीमध्ये त्यांचे पोस्टर लावून आणि पत्रकं वाटून त्यांचा शोध घेतला जात आहे.
अमेठीची जनता आपल्या खासदाराच्या शोधासाठी रेल्वे स्टेशनवर हातात पत्रकं घेऊन उभे आहेत. देशाला आणि अमेठीला राहुल गांधीची गरज असतांना त्यांचा ठावठिकाणा नाही असं तिथल्या नागरिकांचं मत आहे.
अमेठीच्या जनतेला राहुल गांधीची ती आश्वासनं आठवत आहेत, ज्यात त्यांनी वेळोवेळी अमेठीत येत राहू असं वचन दिलं होतं. त्याची राहुल गांधीना आठवण करून देण्यासाठी अमेठीच्या लोकांनी ही शक्कल लढवली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.