नवी दिल्ली : दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर एका सात वर्षांच्या मुलीच्या तोंडामधून तब्बल 202 दात बाहेर काढले आहेत. या मुलीच्या तोंडामध्ये एकूण 232 दात होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
डॉ. अजय रॉय चौधरी यांनी सांगितले की, गुडगावमधील एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन रुग्णालयात आले होते. मुलीला दातांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. एक्सरे काढल्यानंतर मुलीच्या तोंडामध्ये अनेक दात असल्याचे दिसून आले. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर 202 दात काढण्यात आले.
दरम्यान, मुलीची प्रकृती सुधारत आहे. काही दिवसांमध्येच ती खायला सुरवात करेल. तिच्या वाढदिवशीच शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलीला वाढदिवसासाठी हे मोठे बक्षीस असल्याचे कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.