थंडीच्या लाटेमुळे २० जणांचा मृत्यू

 थंडीमुळे उत्तर प्रदेशात २० जणांना जीव गमवावा लागलाय.  शनिवारी किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. थंडीचा कडका आणन नधुक्याचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतूकीला बसला आहे. 

Updated: Dec 27, 2014, 07:13 PM IST
थंडीच्या लाटेमुळे २० जणांचा मृत्यू title=

लखनौ :  थंडीमुळे उत्तर प्रदेशात २० जणांना जीव गमवावा लागलाय.  शनिवारी किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. थंडीचा कडका आणन नधुक्याचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतूकीला बसला आहे. 

उत्तर प्रदेशात आणखी काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता, हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारीही तापमानाचा पारा उतरलेलाच होता. आग्रा शहरात सर्वांत कमी 3.3 डिग्री सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. तर, लखनौ शहरातील तापमान 6 डिग्री सेल्सियस होते. कडाक्याच्या थंडीमुळे 20 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

पूर्व उत्तर प्रदेशात 16 जणांचा, कानपूरमध्ये तिघांचा आणि मेरठमध्ये एकाचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यत थंडीमुळे शंभर अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.