नवी दिल्ली: अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं हवालदील झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अखेर केंद्र सरकारनं दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झोडपलं होतं. या नैसर्गिक आपत्तीनं पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदील झाले होते. नुकसानामुळं कर्जबाजारी झालेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्यादेखील केली होती. अखेर केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या मन की बात ओळखून राज्यासाठी मदत जाहीर केली.
दिल्लीत दुष्काळ आणि अवकाळी पावसानं झोडपलेल्या राज्यांसाठीची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधामोहन सिंह आदी उच्चस्तरीय नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.