राजस्थानात पहिल्यांदा वापरला 'राइट टू रिकॉल'

राजस्थानच्या मांगरोल नगरपालिकाचे अध्यक्षाला पुन्हा पदावरून खाली उतरविण्यासाठी जनमत चाचणी करण्यात आली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 13, 2012, 08:17 AM IST

www.24taas.com, जयपूर
राजस्थानच्या मांगरोल नगरपालिकाचे अध्यक्षाला पुन्हा पदावरून खाली उतरविण्यासाठी जनमत चाचणी करण्यात आली. अशा प्रकारे राउट टू रिकॉलचा अधिकार राजस्थानच्या जनतेने पहिल्यांदा वापरला आहे. या जनमत चाचणीचा निकाल येत्या १४ डिसेंबरला लागणार आहे.
राजस्थानच्या मांगरोल नगरपालिकेचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या भविष्याचा फैसला आज जनतेने जनमत चाचणीच्या माध्यमातून केला आहे. यावेळी रिकामी खूर्ची आणि अशोक जैन याचे चिन्ह असे दोन पर्याय जनतेला देण्यात आले होते. यात रिकाम्या खुर्चीवर जास्त मत पडली तर जैन यांना पदउतार व्हावे लागणार आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये नगरसेवकांनी त्यांच्यावर विकास कामे न करण्याचा आरोप लावला होता. त्यानंतर त्याच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, अध्यक्षाला पदावरून खाली खेचण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे जनतेने राइट टू रिकॉलचा आपला अधिका वापरून आपले मत मत पेटीत नोंदविले आहे. या निकालाकडे आता सर्व जनतेचे लक्ष आहे.