www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शीख दंगलीवर दिलेल्या वक्तव्यानंतर शीख संघटनानांनी निदर्शनं केली आहे. आता माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या तत्कालीन प्रेस सचिव यांनी दिलेल्या वक्तव्यावरून पुन्हा राजकीय वनात रान पेटलं आहे.
ग्यानी झेलसिंग यांचे तत्कालीन सचिव तिलोचन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८४ मध्ये जेव्हा शीखविरोधी दंगल भडकली होती, तेव्हा ग्यानी झेल सिंग यांना दंगलीच्या परिस्थितीवर राजीव गांधींशी बोलायचं होतं. मात्र राजीव गांधी यांनी त्यांचा फोनच रिसिव्ह केलाच नाही.
इंदिरा गांधी यांची सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तेव्हा पहिली दंगल सायंकाळी पेटली. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी कोलकात्याला होते.
राजीव गांधी दिल्लीत परतण्याआधी काँग्रेस नेत्यांनी बैठक बोलावली आणि खूनाचा बदला खून असावा असं सांगण्यात आलं, ही माहिती खुद्द ग्यानी झेलसिंग यांनी जमा केली होती, असंही ग्यानी झेल सिंग यांचे तत्कालीन सचिव त्रिलोचन सिंह यांनी म्हटलं आहे.
गुजरात दंगली थांबवण्यासाठी पोलिसांच्या गोळीबारात १३७ जणांचा मृत्यू झाला मात्र, शीखविरोधी दंगलीच्या कारवाईत फक्त एक जण मारला गेला, असं का?, असा सवालही त्यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत विचारला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.