गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू

पाटण्यात गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय

Updated: Jan 14, 2017, 10:15 PM IST
गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू title=

पाटणा : पाटण्यात गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. या दुर्घटनेतील 8 जणांना सुखरुप वाचवण्यात आलंय, तर 25 जणांना पोहून किनारा गाठलाय.

या बोटीतून जवळपास 80 जण प्रवास करत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. दुर्घटनास्थळी एनडीआरएफडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांना बिहार सरकारकडून चार लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय. तर दुसरीकडे विरोधकांनी या मुद्यावरुन सरकारवर टीका केलीय. सरकारनं या ठिकाणी योग्य व्यवस्था केली नसल्यानं दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय.