बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ!

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

Updated: May 26, 2015, 07:15 PM IST
बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ! title=

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

यामुळे बँकांवर ८३७० करोड रुपयांचा अतिरिक्त ओझं पडणार आहे. हा पगारवाढ १ नोव्हेंबर २०१२ पासून लागू होणार आहे. याचा लाभ सार्वजनिक, जुन्या खाजगी बँका आणि काही परदेशी बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. आयबीएचे अध्यक्ष टी. एम. भसीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ टक्क्यांच्या वाढीमुळे बँकांवर पगारवाढ आणि भत्त्यांसाठी एका वर्षात ४७२५ करोड रुपायांचं ओझं पडले. जर सेवानिवृत्तीलाही यामध्ये सहभागी करण्यात आलं तर हीच रक्कम ८३७० करोड रुपयांपर्यंत जाईल. 
 
सध्या अधिकाऱ्यांसाठी मूळ वेतन १४,५०० ते ५२००० रुपयांपर्यंत आहे... त्यात आता २३,७०० ते ८५,००० रुपयांपर्यंत वाढ होईल. अधिकाऱ्यांसाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या ७.७५ ते ११ टक्क्यांपर्यंत विशेष भत्त्याचीही तरतूद करण्यात आलीय. तसंच, बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी संपूर्ण दिवसाची सुट्टीही मिळणार आहे.

यापूर्वी प्रत्येक बँकेच्या स्तरावर कर्मचाऱ्यांसाठी चिकित्सा खर्च आणि हॉस्पीटलमध्ये भरती होण्याच्या खर्चाची भरपाई केली जात होती. आता आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील चार गैर जीवन वीमा कंपन्यांकडून एकीकृत विमा पॉलिसी घेतलीय. यामुळे, कुटुंबासाठी तीन लाखापासून चार लाख रुपयांपर्यंत चिकित्सा विमा कव्हरही मिळेल. यामुळे, गरजुंना रोख पैशांशिवाय सुविधा उपलब्ध होतील. वेतन संशोधनाच्या या संपूर्ण कवायतीत ११ कर्मचारी संघटना आणि अधिकारी संघटनांनी भाग घेतला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.