१२ वर्षांचा मुलगा बनला देशातला सर्वात लहान 'बाप'!

केरळमध्ये १२ वर्षांचा एक मुलगा एका चिमुरडीचा पिता बनल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. 

Updated: Mar 24, 2017, 08:23 PM IST
१२ वर्षांचा मुलगा बनला देशातला सर्वात लहान 'बाप'! title=

कोचीन : केरळमध्ये १२ वर्षांचा एक मुलगा एका चिमुरडीचा पिता बनल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. 

जेनेटिक प्रोफायलिंगद्वारे हा मुलगाच चिमुरडीचा जैविक पिता असल्याचं सिद्ध झालंय. १२ वर्षांच्या या अल्पवयीन मुलाचे १६ वर्षांच्या मुलीसोबत संबंध होते... नोव्हेंबर २०१६ मध्ये मुलीनं एका चिमुरडीला जन्म दिला होता. तिची चौकशी केल्यानंतर या मुलाचं नाव समोर आलं.  

'द हिंदू'नं दिलेल्या माहितीनुसार, या मुलीनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एर्नाकुलमच्या एका हॉस्पीटलमध्ये एका चिमुरडीला जन्म दिला होता. 

'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स' (POCSO) vgmej, या मुलांच्या पालकांची ओळख गुप्त ठेवण्यात आलीय. परंतु, या १२ वर्षांच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत खटला दाखल करण्यात आलाय. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 'प्रिकॉशिअस प्युबर्टी' म्हणजेच वेळेपूर्वीच सेक्शुअली अॅक्टिव्ह झाल्यानं हा मुलगा चिमुरडीचा पिता बनू शकलाय. सर्वसाधारणत: मुलींमध्ये १० ते १४ वर्ष तर मुलांमध्ये १२ ते १६ वर्षांपर्यंत ही मेडिकल कंडीशन निर्माण होते. परंतु, १२ वर्षांचा मुलगा बाप बनल्याची ही पहिलीच घटना आहे. 

चिमुरडीच्या जन्मानंतर मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी तिला आपलंसं करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी 'चाइल्ड लाईन अथॉरिटी'कडे सोपवण्यात आलीय.