मुरैन: लग्नाची सगळी तयारी झाली होती.. नवरीच्या घरची मंडळी नवऱ्याच्या घरी पोहचणार.. त्याआधीच पोलिसांनी तेथे येऊन लग्न थांबवलं. लग्न थांबवण्याचं कारण होतं मुलाचे आणि मुलीचे वय.
ही घटना मध्य प्रदेश मधील मुरैना जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार लग्न थांबवले कारण नवरी मुलीचे वय होते २५ वर्ष आणि नवरा मुलाचे वय होते अवघे ११ वर्ष.
नवरी मुलगी रेशमाचं लग्न आधी नवरा मुलगा सौरभच्या काकांशी होणार होतं. मात्र हुंड्यांची मागणी करत सौरभच्या काकाने लग्न मोडले. या गोष्टीवरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू झाले. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी पंचायतीची मदत घेण्यात आली. तेथे पंचायतीने हा निर्णय दिला की २५ वर्षीय रेशमाचं लग्न ११ वर्षीय सौरभशी करून द्यावं. यासाठी नवरीच्या घरचेही तयार झाले आणि लग्न २२ एप्रिलला निश्चीत करण्यात आले. मात्र वेळीच पोलिसांनी येऊन हे लग्न थांबवलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.