उत्तर प्रदेशमध्ये योगीराज, १०० पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ एकामागो एक निर्णय घेतायत तसेच निर्णयाची अंमलबजावणी करतायत.

Updated: Mar 23, 2017, 09:58 PM IST
उत्तर प्रदेशमध्ये योगीराज, १०० पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ एकामागो एक निर्णय घेतायत तसेच निर्णयाची अंमलबजावणी करतायत.

उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योगी अदित्यनाथांनी कठोर पाऊले उचललीत. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या १००हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेय. हे कर्मचारी गाझियाबाद, मेरठ आणि नोएडा या भागातील आहेत.

लखनऊमधील सात अधिकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. कामात दिरंगाई करणाऱ्या तसेच टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून आदेश योगीनाथ यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलीये.