दहा वर्षांत १३०३ जणांना फाशीची शिक्षा; फासावर चढले केवळ तीन!

नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत भारतात तब्बल १३०३ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.... पण, यापैंकी केवळ तीन दोषींना फासावर चढवण्यात यश आलंय. गुरुवारी याकूबला फासावर चढवलं तर ही या दहा वर्षांतील चौथी फाशी ठरेल.

Updated: Jul 29, 2015, 05:13 PM IST
दहा वर्षांत १३०३ जणांना फाशीची शिक्षा; फासावर चढले केवळ तीन! title=

नवी दिल्ली : नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत भारतात तब्बल १३०३ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.... पण, यापैंकी केवळ तीन दोषींना फासावर चढवण्यात यश आलंय. गुरुवारी याकूबला फासावर चढवलं तर ही या दहा वर्षांतील चौथी फाशी ठरेल.

पहिली फाशी
पश्चिम बंगालमध्ये १४ ऑगस्ट २००६ रोजी धनंजय चॅटर्जी याला अलीपूर मध्यवर्ती कारागृहात त्याच्या ४२ व्या वाढदिवसालाच फाशी देण्यात आली. धनंजय हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्याच्या आरोपातला दोषी होता.

दुसरी फाशी
२००८ मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा तुरुंगात चढवण्यात आलं. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबला फासावर लटकावण्यात आलं.

तिसरी फाशी
२००१  साली संसदेवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

पण, उल्लेखनीय म्हणजे गेल्या दहा वर्षांत सुप्रीम कोर्टानं ३,७५१ जणांच्या फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेत बदललंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.