योग दिनी मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी योगाही केला. योग दिनाच्या दिवशी मोदींनी काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाषण केले.

Updated: Jun 21, 2016, 06:33 PM IST
योग दिनी मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे title=

नवी दिल्ली : दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी योगाही केला. योग दिनाच्या दिवशी मोदींनी काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाषण केले.

 

योगदिनाच्या पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे...

- पूर्वी काही हेल्थ इंन्श्युरन्स नसायचे. पण योगा आपल्याला आजारांपासून दूर ठेवतो. योग आपल्याला हेल्थ अशॉरन्स म्हणजेच निरोगी राहण्याची हमी देते.

- योगामुळे आपल्याला काय मिळते असं नसतं तर आपण योगामुळे कोणत्या वाईट गोष्टी सोडून देतो त्याला अधिक महत्त्व आहे.

- योगा हादेखील एक व्यवसाय होत चालला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना रोजगारही मिळत आहे.

- २४ तास योगा दाखविणाऱ्याही जगात अनेक वाहिन्या आहेत.

- स्त्रीरोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलांनी नियमीत योगा करणं आरोग्यासाठी लाभदायक आहे.

- या धकाधकीच्या जीवनात आपण स्वत:पासूनच दूर झाले आहोत. मात्र, योगामुळे आपण स्वत:वर लक्ष देऊ शकतो.

- योगा दिनी पंतप्रधानांनी दोन पुरस्कारांची घोषणा केली. जे योगा या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील त्यांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर असे दोन पुरस्कार देण्यात येतील.

- योगाला या जगात श्रेष्ठ स्थान मिळू दे. भारतीय जगातील योगाचे उत्तम प्रशिक्षक होऊ देत.  

- योगामुळे फक्त रोग दूर नाही होत तर रोगमुक्त राहण्याची त्याची खात्री मिळते.

- ज्याप्रमाणे मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनली आहे त्याप्रमाणेच योगाला ही बनवा.