नवी दिल्ली : प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.
ट्रेन बूक करण्याची काय आहे प्रक्रिया
१. सात दिवसांकरिता बोगी बूक करायची असेल तर तुम्हाला त्याकरिता ५०,००० भरावे लागतील.
२. जर सात दिवसांकिरता तुम्हाला पूर्ण ट्रेन बूक करायची असेल तर ९ लाख रूपये भरावे लागतील.
३. जर तुम्हाला अधिक डब्बे हवे असतील तर प्रत्येक डब्ब्यामागे ५०००० भरावे लागतील.
४. सात दिवसांहून अधिक दिवस बूकिंग करायचे असेल तर प्रत्येक दिवसामागे एका बोगीचे १०००० रूपये द्यावे लागतील.
हे बदलदेखील होतील
१. १ जुलैपासून तत्काळ तिकीट रद्द केल्यानंतर ५० टक्के पैसे परत मिळणार.
२. हिंदी, इंग्रजी शिवाय अन्य भाषांमध्येही तुम्हाला तिकीट मिळेल.
३. राजधानी आणि शताब्दी ट्रेनच्या बोगींची संख्या वाढवली जाईल.
४. सुविधा ट्रेनचे नियमदेखील बदलण्यात येतील. आगाऊ तिकीट तीस दिवस आधी नाहीतर किमान दहा दिवस आधी बूक करता येईल.
५. जुलैपासून राजधानी आणि शताब्दी ट्रेनचे फक्त मोबाईलवरील तिकीट वैध असेल.
६. ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांना आता फक्त कन्फर्म किंवा आर.ए.सीचे तिकीट मिळेल. वेटिंगमध्ये ऑनलाईन तिकीट मिळणार नाही.
याआधी सुद्धा रेल्वेने घोषित केले होते की १ जुलैपासून राजधानी, शताब्दी, दुरंतो, आणि मेल-एक्सप्रेस ट्रेनसोबतच सुविधा ट्रेन देखील सुरु होतील.