www.24taas.com, झी मीडिया,डेहराडून
उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मदत मिळत नाही. तसेच अन्न-पाण्यावाचून दिवस काढावे लागत असल्याने आम्हाला वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका आणि उडवून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांने व्यक्त केलेय.
हिमालयातील अस्मानी संकटाच्या बळींची संख्या हजारांवर जाण्याची भिती व्यक्त होत आहे. अद्यापही अनेकजण बेपत्ता असून, त्यांच्यापर्यंत मदत पोचलेली नाही. त्यातच केदारनाथ मंदिराच्या परिसरात अनेक मृतदेह पडले आहेत. अनेक मृतदेहांवर पाच दिवसानंतरही अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत. परिसरात मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, असे राज्याचे कृषिमंत्री हरकसिंह रावत यांनी सांगितले.
भाविकांना वाचवू शकत नसाल तर किमान बॉम्ब टाका सर्व काही संपवून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया एका भाविकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या ठिकाणी अडकलेले भाविक हताश झाल्याचे दिसत आहे. काहींनी मृतदेहाजवळ उभे राहून दिवस काढले. काहीजण मृतदेहाच्यावर दगडीवर अन्न-पाण्यावासून गोठवणाऱ्या थंडीत आहेत. पुरानंतर भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे. लष्कराचे मदत कार्य सुरू आहे. हवाईदलाची मदत घेतली जात आहे. मात्र, अडकलेल्यांना बाहेर काढण्यात वेळ जात आहे.
दरम्यान, उपचार घेत असलेल्या एका भाविकाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, माझा तीन वर्षांचा मुलगा आणि मी 14 किलोमीटर चालत आल्यानंतर बचावलो आहोत. कुटुंबातील इतर चार सदस्य अद्यापही बेपत्ता आहेत. माझे कुटुंबीय कोठून बेपत्ता झाले आहेत, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, कोणीही ऐकून घेत नाही. उपासमारीमुळे अनेकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. एकच सांगणे आहे की, बचावलेल्या भाविकांना वाचवू शकत नसाल तर तेथे किमान बॉंब टाका. परंतु, त्यांना तडफडून मरून देऊ नका. आम्ही अनेकांना तडफताना पाहिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.