प्रमोशनसाठी पत्नीला करायला लावली १० जणांशी शय्यासोबत!

भारतीय नौदलात नैतिक अधःपतनाची घटना समोर आली आहे. कोची येथी एका तरुण नौसेना अधिकाऱ्याच्या पत्नीने आपला पती आणि त्याच्या दहा वरीष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे, की पदोन्नतीसाठी आपल्या पतीने आपल्याला वरीष्ठ अधिकाऱ्यांशी शय्यासोबत करण्यास भाग पाडले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 11, 2013, 07:16 PM IST

www.24taas.com, कोच्ची
भारतीय नौदलात नैतिक अधःपतनाची घटना समोर आली आहे. कोची येथी एका तरुण नौसेना अधिकाऱ्याच्या पत्नीने आपला पती आणि त्याच्या दहा वरीष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे, की पदोन्नतीसाठी आपल्या पतीने आपल्याला वरीष्ठ अधिकाऱ्यांशी शय्यासोबत करण्यास भाग पाडले.
कोच्ची पोलिसांकडे महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर तिचा पती आणि १० नौसेना अधिकार्यांवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याला नोकरीत बढती मिळावी यासाठी आपल्या नवऱ्याने पत्नीचा गैरवापर केला. तिला वरीष्ठ अधिकाऱ्यांशी शय्यासोबत करण्यास भाग पाडलं. या घटनेत कमोडोर पदावरील एक अधिकारी, नौदलाचे सहा ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौदलाने या आरोपांना आधारहीन म्हटलं आहे. मात्र महिलेने आपल्याला आता जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. ‘आमच्यावरील केस मागे न घेतल्यास मारून समुद्रात फेकून देऊ’ अशी धमकी मिळाल्याचं महिलेने एका टीव्हीवर मुलाखत देताना सांगितलं.