इंडिया वि. इंग्लंड : दुसऱ्या वन-डेसाठी कोची सज्ज!

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी वन-डे कोचीमध्ये रंगणार आहे. पहिली लढत गमावलेल्या टीम इंडियासमोर कमबॅकचे आव्हान असेल तर सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतलेल्या इंग्लंड टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. म्हणूनच धोनी सेनेसमोर इंग्लिश ब्रिगेडचं आक्रमण रोखण्याचं कडवं आव्हान असणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 14, 2013, 07:01 PM IST

www.24taas.com, कोची
टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी वन-डे कोचीमध्ये रंगणार आहे. पहिली लढत गमावलेल्या टीम इंडियासमोर कमबॅकचे आव्हान असेल तर सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतलेल्या इंग्लंड टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. म्हणूनच धोनी सेनेसमोर इंग्लिश ब्रिगेडचं आक्रमण रोखण्याचं कडवं आव्हान असणार आहे.
पाकिस्तविरूद्ध आत्मसमर्पण केल्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या पहिल्याच लढतीमध्ये धोनी अॅन्ड सेनेने शरणागती पत्करली. म्हणूनच आता टीम इंडियासमोर कमबॅक करण्याचं अवघड आव्हान असणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान कोची इथं दुसरी वन-डे रंगणार आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर फ्लॉप ठरत असलेल्या टीम इंडियाला आता कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करावीच लागेल. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणारी खराब कामगिरी आणि यामुळे होणारी टीका... त्यातच पहिल्याच लढतीत पत्करावा लागलेला पराभव यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास खचलेला असेल. तर दुसरीकडे टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर वन-डे सीरिजची सुरूवातही विजयी सलामी देऊन केलेल्या इंग्लंड टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. आता दुसऱ्या वन-डेसाठी धोनी टीममध्ये काही बदल करतो का याकडे लक्ष द्याव लागेल.

गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणेवर पुन्हा एकदा चांगली ओपनिंग देण्याची जबाबदारी असेल. यानंतर विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीवर मिडल ऑर्डरची भिस्त असेल. तर चेतेश्वर पुजाराला टीममध्ये संधी मिळते का आणि रविंद्र जाडेजाचही टीममधील स्थान कायम राहत का हे याकडे भारतीय क्रिकेट फॅन्सच लक्ष असेल. बॉलिंगमध्ये अशोक डिंडा, ईशांत शर्मा आणि युवा भुवनेश्वरसमोर इंग्लिंश बॅट्समनला लवकरात लवकर आऊट करण्याच आव्हान असेल. तर आर. अश्विनला आता आपल्या फिरकीची जादू दाखवावीच लागेल.

दुसरीकडे इंग्लिश ब्रिगेडमध्ये बॅटिंगच्या साऱ्या आशा पुन्हा एकदा कॅप्टन ऍलिस्टर कूक आणि ईयान बेलवर एकवटलेल्या असतील. याशिवाय केविन पीटरसन, ईयान मॉर्गन हेदेखील टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतात. तर पहिल्या वन-डेत टीम इंडियाची दाणादाण उडवून देणारा जेम्स ट्रेडवलच्या फिरकीचा टीम इंडियाच्या बॅट्समनला चांगलाच धोका आहे. याशिवाय टीम ब्रेसनन, जेड डर्नबच आणि स्टिवन फिन यांच्या वेगवान माऱ्यापासून टीम इंडियाच्या बॅट्समनला सावध रहावं लागेल. आता दुसऱ्या लढतीत इंग्लिश ब्रिगेड पुन्हा एकदा टीम इंडियावर भारी पडते का? की धोनी सेना कूकच्या सेनेच आक्रमण रोखते याकडेच तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलंय. जर टीम इंडियाने या लढतीत कमबॅक केल नाही तर धोनी अॅन्ड कंपनीसाठी आगामी वाटचाल अधिकच खडतर होईल, एव्हढं मात्र नक्की.