लैंगिक संबंधामुळेही पसरतो झिका विषाणू

आतापर्यंत डासांमुळे झिका विषाणू पसरत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र अमेरिकेत लैंगिक संबंधामुळे झिका व्हायरस पसरत असल्याचे समोर आलेय. 

Updated: Feb 3, 2016, 01:10 PM IST
लैंगिक संबंधामुळेही पसरतो  झिका विषाणू title=

नवी दिल्ली : आतापर्यंत डासांमुळे झिका विषाणू पसरत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र अमेरिकेत लैंगिक संबंधामुळे झिका व्हायरस पसरत असल्याचे समोर आलेय. 

अमेरिकेच्या टेक्सांस प्रांतात एका व्यक्तीला लैंगिक संबंधामुळे झिका विषाणूची बाधा झाल्याचे समोर आलेय. 'द सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंटेशनने' याला दुजोरा दिलाय. दल्लास काउंटी येथे असा रुग्ण आढळलाय.

दल्लास काउंटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक संबंधानंतर त्याच्या शरीरात झिका विषाणू आढळल्याचे समोर आलेय. ज्या देशात हा विषाणू आढळलाय तेथील व्यक्तीसोबत याने लैंगिक ठेवले होते. 

सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये झिका विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक आणीबाणी जाहीर करण्यात आलीये. भारतात या विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी सरकारडून गटही स्थापन करण्यात आलाय.