रात्रपाळीत काम करणाऱ्यांनो, सावधान!

रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांना आणि विमानप्रवास करणाऱ्यांची पुरेशी झोप न झाल्यानं आपल्या `जीन`ला पुन्हा एकदा आकारात आणण्यासाठी आपल्या दिनचर्येला योग्य पद्धतीनं निर्धारित करण्याची गरज असते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2014, 07:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांना आणि विमानप्रवास करणाऱ्यांची पुरेशी झोप न झाल्यानं आपल्या `जीन`ला पुन्हा एकदा आकारात आणण्यासाठी आपल्या दिनचर्येला योग्य पद्धतीनं निर्धारित करण्याची गरज असते. `युनिव्हर्सिटी ऑफ सरे`च्या एका अभ्यासात, झोपेच्या वेळीच म्हणजेच रात्रीच्या वेळी रात्रपाळीत काम करण्यानं आपल्या `जीन्स`च्या दैनंदिन लयीवर लगेच फरक जाणवतो.
`यूनिव्हर्सिटी ऑफ सरे` इंग्लंडच्या निद्रा शोध केंद्राचे प्रोफेसर डर्क-जैन दिज्क यांच्या म्हणण्यानुसार हा शोध, रात्रपाळींना, जेट लेग आणि आपल्या जीन्सच्या लयीला बाधित करणाऱ्या अन्य परिस्थितीला जोडणाऱ्या नकारात्मक स्वास्थ समस्यांना समजण्यासाठी आपली मदत करतो.
शोधकर्त्यांनी २२ सहभागिंना प्राकृतिक प्रकाश आणि अंधाररहित एका नियंत्रित वातावरणात २८ तास ठेवलं होतं. परिणाम म्हणून, त्यांच्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या चक्रात प्रत्येक दिवशी चार तासांचा उशीर होता. त्यानंतर शोध दलानं जीन अभिव्यक्तीची लय जाणून घेण्यासाठी सहभागिंचे रक्ताचे नमुने जमा केले.
झोपेच्या वेळी व्यत्यय आल्यास सर्केडियन लय (२४ तासांच्या चक्रासोबतची शरीराची प्रक्रिया) यांमध्ये दिसणाऱ्या जीन्सच्या संख्येत सहा टक्के घट आढळून आल्याचं, प्रोसिडिंग्स ऑफ `नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स` जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनात म्हटलं गेलंय. या संशोधनात, झोपण्याच्या आणि जागण्याच्या चक्रातून जीन नियमित केले जाऊ शकतात, असंही सांगितलं गेलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.