www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याचदा थकवा जाणवत असेल... अगदी तुम्ही काही अंगमेहनतीची कामं न करता खुर्चीत बसून काम करत असाल तरीही हा थकवा तुम्हाला जाणवू शकतो... अर्थातच, त्याचा थोडाफार का होईना पण, त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो.
बऱ्याचदा, वैयक्तिक कारणांमुळे आपल्या डोक्यात काही वेगळेच विचार चाललेले असतील, किंवा तुम्ही एखाद्या कारणानं मानसिक तणावाखाली असाल तर मानसिक तुम्हाला थकवा जाणवू शकतो. पण, अशा प्रकारचा थकवा तुम्हाला टाळता येऊ शकतो...
चला तर पाहुयात अशा काही गोष्टी ज्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये अगदी फ्रेश माईंडनं काम करू शकाल...
* तुम्ही काम करताना प्रवास करीत असाल, तर हाय ब्लडप्रेशर आणि वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवास करताना ऑडिओ बुक किंवा संगीताचा आनंद घेऊन या आजारांच्या धोक्यापासून स्वत:ला वाचवता येईल.
* बॉस किंवा कंपनीच्या व्यवस्थापनाने परवानगी दिल्यास कामादरम्यान छोटे-छोटे ब्रेक घ्या. त्यामुळे कामावर जास्त फोकस करता येतो आणि तुम्ही थोडे रिलॅक्स होतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधनकर्त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्याचप्रमाणे व्यायामाने कार्यक्षमता वाढवता येते.
* दिवसातील महत्त्वाचा वेळ कार्यालयात जातो. त्यामुळे सहकार्यांसोबत आपले संबंध मधुर ठेवा. तसेच त्यांच्याशी चांगली आणि सकारात्मक वर्तणूक करा. यामुळे आनंदी राहता येते व प्रकृतीही चांगली राहते.
* पौष्टिक आहार घेतल्यास मूड चांगला राहतो व त्यामुळे चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तसेच कामात सुधारणा पाहण्यास मिळतात. याबाबत कॅनडात झालेल्या एका अभ्यासात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. नाष्ट्यात दही, फळे यांचा समावेश केला पाहिजे. बदामासारखे अँटिऑक्सिडंट असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते. तसेच प्रोटीनमुळे जास्त भूक लागणार नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहील.
* नियमित व पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे दुसर्या दिवशी नवीन जोमाने पुन्हा कामास प्रारंभ करता येतो. तसेच तुमच्या कामातही सुधारणा दिसून येते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.