मासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते. 

Updated: Jan 6, 2015, 04:38 PM IST
मासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा title=

टोरंटो: नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते. 

कॅनडाच्या मॉन्ट्रियल विश्वविद्यालयाची एड्रीयाना मेंड्रेक यांनी सांगितलं, “आम्हाला संशोधनातून जे आकडे मिळाले त्याद्वारे माहिती मिळते की, मासिक पाळीच्या सुरूवातीच्या सात दिवसांमध्ये महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा नियंत्रणाच्या बाहेर होते. हा शोध धुम्रपान सोडण्यासाठी लिंगाच्या आधारे उपचार घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ” मेंड्रेक स्पष्ट करत सांगतात, महिलांमध्ये धुम्रपानाची सवय सोडविण्यासाठी मासिक धर्माच्या माहितीची मदत होऊ शकते. 

मासिक चक्राच्या दुसऱ्या चरणात ओव्हुलेशननंतर महिलांमध्ये धुम्रपानचं व्यसन सोडविणं सोपं होतं. कारण या काळात ओस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. मेंड्रेकनं हे सुद्धा सांगितलं की, मानसिक-सामाजिक घटक याद्वारे बाहेर ठेवलं जावू शकत नाही. 

संशोधकांनी एका दिवसात १५ पेक्षा जास्त सिगारेट पिणाऱ्या ३४ पुरुष आणि महिलांवर संशोधन केलं. शोधादरम्यान सहभागी व्यक्तींकडून प्रश्नावलीही भरवून घेतली गेली आणि त्यांच्या डोक्याचा MRI स्कॅन पण करवला गेला. सहभागी व्यक्तींना धुम्रपानासाठी प्रेरित करणारे फोटो दाखवच त्यांच्या डोक्याचा स्कॅन केला गेला. 

मेंड्रेक सांगते, धुम्रपान करणाऱ्याचं प्रोफाइलनुसार त्यांना व्यसनाधिन बनविणाऱ्यासाठी जबाबदार असलेल्या न्यूरोबायोलॉजिकल तंत्राशी जोडलेली माहिती, धुम्रपान सोडण्यासाठी चांगला इलाज ठरू शकतो. हा शोध ‘सायकियाट्री’ नावाच्या संशोधन मासिकाच्या ताज्या अंकात प्रकाशित झालाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.