काही लोकांनाच डास अधिक का चावतात?

अस्वच्छता, घाणीमुळे डासांची पैदास वाढते. हे डास चावल्याने डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे आजार होण्याचीही शक्यता असते. मात्र डास काही लोकांनाच अधिक चावतात. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?... रक्त गोड असणाऱ्या व्यक्तींना अधिक डास चावतात असे मजेखातर म्हटले जाते. मात्र विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याचीही कारणे आहेत.

Updated: Aug 10, 2016, 11:34 AM IST
काही लोकांनाच डास अधिक का चावतात? title=

मुंबई : अस्वच्छता, घाणीमुळे डासांची पैदास वाढते. हे डास चावल्याने डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे आजार होण्याचीही शक्यता असते. मात्र डास काही लोकांनाच अधिक चावतात. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?... रक्त गोड असणाऱ्या व्यक्तींना अधिक डास चावतात असे मजेखातर म्हटले जाते. मात्र विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याचीही कारणे आहेत.

जाणून घ्या ही कारणे

ब्लडग्रुप ओ असल्यास - एखाद्या व्यक्तीचा ब्लडग्रुप ओ असल्यास अशा व्यक्तींमध्ये डास अधिक आकर्षित होता. त्यानंतर त्यानंतर ए ब्लडग्रुप,  बी रक्तगट आणि एबी ब्लडग्रुपच्या व्यक्तींकडे डास आकर्षित होतात.

गर्भवती स्त्रिया तसेच लहान मुले - गर्भवती स्त्रिया तसेच लहान मुलांना डास अधिक प्रमाणात चावतात. मेटाबोलिक रेट अधिक असणाऱ्या याव्यक्तींमध्ये डास चावण्याचे प्रमाण जास्त असते. 

शरीरातील जनुके mosquito magnet असल्यास - दी जर्नल इन्फेक्शन, जेनेटिक्स आणि इव्होल्यूशन २०१३च्या अभ्यासानुसार शरीरातील काही विशिष्ट जनुके डासांना आकर्षित करतात. ज्या व्यक्तींच्या शरीरात अशी जनुके असतात त्यांना डास अधिक चावतात.