मुंबई : अनेकदा विमानातून प्रवास करताना कानात दडे निर्माण होणे, कानदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग होत असताना निर्माण होणाऱ्या आवाजामुळे कानदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. यावेळी खालील उपाय फायदेशीर ठरतात.
कानात फुंकर घाला - मोठ्या आवाजाने कानात दडे निर्माण झाल्यास कानात फुंकर घाला.
आळस द्या- आळस देताना कानाचे आखडलेले स्नायू मोकळे होतात. त्यामुळे कानदुखी, तसेच कानात दडे होत नाहीत.
गोड पदार्थ खा - प्रवासादरम्यान कान दुखत असल्यास गोड पदार्थ खा. यामुळे कानदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
कानदुखीची समस्या असल्यास विमानात प्रवासासाठी जाण्याच्या दीडतास आधी पेनकिलर घ्या.