मुंबई : टीबी होण्याची अनेक कारणे आहेत. टीबीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टीबीच्या आजाराबाबत योग्य प्रसार व्हावा यासाठीच महानायक अमिताभ बच्चन हे देखील मोहिम राबवत आहेत.
पण टीबीचे पेशंट्स वाढण्याची काय कारणे आहेत?
तरुण मुलींमध्ये टीबी अधिक प्रमाणात का दिसून येतोय ?
डाएट कॉंन्शस मुलींसाठी महत्त्वाचा इशारा.
तुम्ही बारीक होण्यासाठी डाएट करतायत का ?
तुम्हाला वजन शॉर्टकटमध्ये कमी करायचंय ?
मग सावधान ! तुम्हाला टीबी होऊ शकतो...
रॅम्पवर चालणा-या हॉट आणि बोल्ड मुलींसारखं आपणंही दिसावं. आपलीही फिगर त्यांच्यासारखीच असावी, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते.
त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे वजन घटवणे, आणि त्यासाठी वापरला जातो शॉर्टकट. मुलींमध्ये या शॉर्टकट डाएटची प्रचंड क्रेझ आहे. अशा विचित्र उपायांमुळेच तरुण मुलींमध्ये टीबीचा धोका वाढतोय.
टीबीचे किटाणू हे प्रत्येकाच्या शरीरात असतात. अशा किटाणूंचा सामना करण्यासाठी शरीर सुदृढ असायला हवं. पण वजन कमी करण्याच्या नादात शरीरातलं प्रोटीन कमी झालं, तर टीबी होऊ शकतो.
फिटनेसबाबत तरुण पिढी काळजी घेतेय, हे चांगलीच गोष्ट आहे. पण वजन कमी करणे म्हणजे फिट राहणे असाही गैरसमज तरुणांमध्ये आहे.
हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस.. अर्थात अर्धवट माहिती नेहमीच धोकादायक असते. त्यामुळे कुठलंही डाएट अपुरी माहिती घेऊन करू नका.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.