लठ्ठपणा रोखण्यासाठी सकाळी नाश्ता करणं आवश्यक!

सकाळी नाश्ता न केल्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो, असं एका अभ्यासातून पुढे आलंय. सकाळी नाश्ता न केल्यानं जास्त भूख लागते. हे वजन वाढण्यास महत्वपूर्ण कारण होऊ शकतं.

Updated: Oct 18, 2014, 03:27 PM IST
लठ्ठपणा रोखण्यासाठी सकाळी नाश्ता करणं आवश्यक! title=

न्यू यॉर्क : सकाळी नाश्ता न केल्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो, असं एका अभ्यासातून पुढे आलंय. सकाळी नाश्ता न केल्यानं जास्त भूख लागते. हे वजन वाढण्यास महत्वपूर्ण कारण होऊ शकतं.
 
या अभ्यासानुसार असं सांगितलंय की, सकाळी प्रोटीन युक्त नाश्त्याचं सेवन केल्यामुळं बुद्धमत्तेचा स्तर वाढतो. यामुळं दिवसभर जास्त भूख लागत नाही. जर भूख लागली तर गरजेपेक्षा जास्त जेवण जेवत नाही.

सकाळी नाश्ता केल्यामुळं दुपारी गोड खाण्याची इच्छा कमी होते. प्रोटीन युक्त नाश्ता केल्यामुळं मसालेदार जेवण खाण्याची इच्छा कमी होते. तर दुसरीकडे सकाळी नाश्ता न केल्यानं मसालेदार जेवण खाण्याची इच्छा होते, असं अमेरिकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ मिस्सुरीमध्ये पोषण आणि व्यायाम फिजियॉलॉजीचे सहायक प्रोफेसर हीथर लेडने यांनी सांगितलंय.  हा अभ्यास जर्नल न्यूटीशियनमध्ये प्रकाशित झाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.