जयपूर : कंज्युमर युनिटी अॅण्ड ट्रस्ट सोसायटीने (कट्स) रासयनिक शेतीपेक्षा जैविक/नैसर्गिक शेती करण्याबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी फळे आणि भाज्यांमध्ये १४० टक्क्यांपेक्षा जास्त किटकनाशके आढळल्याचे पुढे आले आहे.
कट्सने घरामध्ये भाज्यांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या घरासभोवती परिसरात, गार्डन किंवा टेरेसवर भाजी लागवड केली तर त्याचा निश्चित फायदा होईल.
कृषी विभागाचे अतिरिक्त निदेशक शीतल प्रसाद शर्मा यांनी सांगितले की, जैविक शेतीसाठी १२५ कोटींची मदत झाली आहे. एकेएन विद्यापिठाचे संशोधन निदेशक डॉ. के रामाकृष्णा यांनी सांगितले, जैविक शेतीसाठी सर्व तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे. आज बाजारामध्ये मिळणारे अनेक खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. मात्र, यामध्ये अधिकतर किटकनाशक किंवा रासायनिक पदार्थांचा उपयोग केला गेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.