मुंबई : मुलाच्या आहारावर त्यांचा नुसता शारीरिकच नाही तर मानसिक आणि बौद्धिक विकासही अवलंबून असतो, त्यांच्यातील कल्पकता, सृजनता, चौकस वृत्तीला खतपाणी द्यायचे असेल, तर संतुलित आणि परिपूर्ण आहाराचे योगदान महत्त्वाचे आहे.
मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना तसेच शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींसाठी डबा तयार करतांना खालील गोष्टींचा विचार करायला हवा.
रक्तधातुपोषक - केशर, मनुका, सुके अंजिर, डाळिंब, काळे खजूर, काळे ऑलिव्ह, सफरचंद, पालक, गूळ
मांसधातुपोषक - दूध, लोणी, सुके अंजिर, खारीक, तूर डाळ; मूग, मटकी, मसूर, चणे वगैरे कडधान्ये
अस्थिधातुपोषक - दूध, गहू, खारीक, डिंक, खसखस, नाचणी सत्त्व
मज्जाधातुपोषक - पंचामृत, लोणी, तूप, बदाम, अक्रोड, जर्दाळू
तृणधान्ये : तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे
द्राक्षे, शहाळी, ओला नारळ, गोड मोसंबी, पपई, आंबा वगैरे ऋतुनुसार उपलब्ध असणारी ताजी आणि गोड फळे
ताज्या भाज्या : काकडी, गाजर वगैरे कोशिंबिरी; दूध, लोणी, तूप वगैरे स्निग्ध पदार्थ; मध वगैरे गोष्टी मुलांच्या आहारात असायला हव्यात.