हिंग खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत?

जर तुम्ही तुमच्या कमी सेक्स क्षमतेमुळे चिंतीत असाल तर घाबरू नका... यावर साधा-सोप्पा उपाय तुमच्या घरातच आहे. 

Updated: Nov 21, 2015, 04:34 PM IST
हिंग खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत? title=

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या कमी सेक्स क्षमतेमुळे चिंतीत असाल तर घाबरू नका... यावर साधा-सोप्पा उपाय तुमच्या घरातच आहे. 

सेक्स क्षमता वाढवण्यासाठी सहजसोप्पं उपलब्ध असणारं हिंग खूपच उपयोगी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पुरुषांचं नपुसंकत्व दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून हिंगाचा वापर केला जातो. यामुळे, ज्या पुरुषांना पूर्वस्खलनाची समस्या भेडसावते त्यांना हिंगाची नैसर्गिक पद्धतीनं मदत होते. 

हर्ब दॅड हील : नॅचरल रेमेडी फॉर गुड हेल्थ या पुस्तकानुसार, ४० दिवसांपर्यंत ०.०६ ग्रॅम हिंगाचं सेवन केल्यानं तुम्ही सेक्स ड्राइव्ह सुधारू शकता. यासाठी ०.०६ ग्रॅम हिंग घेऊन ते तुपात फ्राय करून घ्या. त्यानंतर त्यात मध आणि वडाच्या झाडाची साल मिश्रण बनवून घ्या. नपुंसकता दूर करण्यासाठी दररोज सूर्य उगवण्यापूर्वी हे मिश्रण रिकाम्या पोटी ४० दिवसांपर्यंत सेवन करा. 

इरेक्टाईल डिसफंक्शन आणि वेळेपूर्वीच स्खलनाची समस्या दूर करण्यासाठी हिंग काम करतं. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमुटभर हिंगाची पावडर टाकून पिल्यानं त्याचा फायदा होतो. हिंगाचा डाएटसाठी उपयोगही फायदेशीर ठरतो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.