कंबरदुखीवर हे उपाय करा

Updated: Sep 2, 2016, 03:41 PM IST
कंबरदुखीवर हे उपाय करा title=

मुंबई : कंबरदुखी हे दुखण प्रत्येकाला रोज सहन करावं लागत. कामावर एका ठिकाणीच जास्त वेळ बसून काम केल्याने कंबर दुखी: सुरू होते. याशिवाय जड वस्तू उचलल्याने हे दुखण सुरू होऊ शकतं.

कंबर दुखत असतांना कोणतीही पेन किलरची गोळी खाऊ नका. या गोळीने शरीरात दुसऱ्या समस्या निर्माण होतात.

कंबर दुखणं थांबविण्यासाठी हे करा.

- ऑफिसमध्ये जास्त वेळ कंप्यूटरवर बसू नका.

- प्रत्येक तासातून 5 मिनिटं बाहेर फिरून या

- बसण्यासाठी आरामदायी खुर्चीचा वापर करा.

-  बसताना आपले गुडघे 90 डिग्रीवर असणे गरजेचे आहे. बसल्यावर कंबर सरळ ठेवा.

- उठताना तोल सांभाळून उठावं.

- जड वस्तू पटकन उचलू नये.