मुंबई : दातांमुळे आपल्या सौंदर्यात अधिक भर पडते. मात्र, दात पिवळे किंवा किडके असल्यास ते सौंदर्याला मारक ठरतात. तसेच अनेक पालकांना मुलांच्या दातांचा पिवळेपणा डोकेदुखी ठरतो. तुम्ही खालील घरगुती उपया केले तर दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. दातांची चमक वाढवून पिवळेपणा कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय पाहा.
१. दररोज कडू लिंबाच्या काडीने दात घासणे चांगले. दातांचे रोग होत नाही आणि दातांचा पिवळेपणा कमी होतो.
२. केळीची साल हलक्या हाताने पाच मिनिट दातांवर रगडा, दात चमकू लागतील.
३. तुळशीची पाने सावलीत वाळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्यास दात चकमतील.
४. काजू, बदाम चावून खाणे. आठवड्यातून तीन दिवस दहा ते बारा काजू, बदाम चावून चावून खल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो.
५. स्ट्रॉबेरी बारीक करुन त्यामध्ये बेकिंस सोडा मिसळा. याचे मिश्रण ब्रशने दातांवर घासा. तुम्हाला किमान दोन आठवड्यानंतर दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.
६. कापसाच्या सहाय्याने दातांवर ऑलिव्ह ऑईलने मजास केल्यामुळे दातांची चकम वाढण्यास मदत होते.
७. फळ साली सहित खावीत. त्यामुळे दात चकमकदार होतात.
८. लिंबू आणि संत्र्याची साल वाळवून बारीक पावडर तयार करावी. त्यानंत त्या पावडरने दात घासावेत. दात चमकायला लागतात.
९. दातासाठी मीठ चांगले. मिठामध्ये मोहरीचे तेल दोन ते तीन थेंब मिसळा. त्यानंतर दात घासल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो.
१०. जेवण केल्यानंतर गाजर खावे. त्यामुळे दातांमधील स्वच्छता होण्यास मदत होते. तर दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.