जाणून घ्या: डार्क सर्कल्स कमी करण्याचा फंडा

सुंदर डोळ्यांमुळं लोकांच्या नजरा तुमच्याकडे आकर्षित होतात. पण याच सुंदर डोळ्यांखाली जर काळी वर्तुळं आली तर चेहर्‍याची सुंदरता कमी होते. 

Updated: Jun 9, 2015, 05:26 PM IST
जाणून घ्या: डार्क सर्कल्स कमी करण्याचा फंडा title=

मुंबई: सुंदर डोळ्यांमुळं लोकांच्या नजरा तुमच्याकडे आकर्षित होतात. पण याच सुंदर डोळ्यांखाली जर काळी वर्तुळं आली तर चेहर्‍याची सुंदरता कमी होते. 

आजकाल महिलांबरोबर पुरुषांमध्येही डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या वाढू लागली आहे. याचं प्रमुख कारण आहे रोजची धावपळ आणि जागरण... ज्यांना पुरेसा आराम मिळत नाही आणि जे सतत तणावग्रस्त असतात, त्यांच्यामध्येच ही समस्या जास्त दिसून येते. काळ्या वर्तुळांमुळं स्मार्टनेस कमी होतो. त्यावर हे सोपे उपाय...

खास उपाय -

- अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेतली नसेल तर तरीही डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होतात. हे टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्यायला हवी. त्यामुळं डोळ्यांवर ताण पडणार नाही.

- चहाचा उरलेला चोथा फ्रीजमध्ये ठेवायचा. तो थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्याखाली हलक्या हातानं चोळल्यासही आराम मिळेल.

- डोळ्याखालील काळी वर्तुळं घालविण्यासाठी काकडीचे गोल काप फार उपयोगी ठरतात. त्यामुळं डोळ्यांना आरामही मिळतो. काकडीचे काप चांगले क्लींझर आहे. काकडीचे गोल काप करून ते दिवसातून दोन ते तीनवेळा १० मिनिटं डोळ्यांवर ठेवल्यास काळी वर्तुळं नाहीशी होतात.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.