मुंबई : हल्ली प्रत्येकाला केस गळीतीची समस्या सतावते. ही समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध केमिकल्स उत्पादनांचा केसांवर भडिमार करतात. मात्र परिणाम काही होत नाही.
तुम्हीही केसगळतीने त्रस्त असाल तर हे चमत्कारिक तेल नक्कीच तुम्हाला फायदा देईल. यासाठी तुम्हाला किचनमधील फक्त ५ वस्तूंचा वापर करावा लागेल. घरच्याघरी कोणतेही केमिकल उत्पादने नसलेले हे तेल तुमच्या गळत्या केसांसाठी वरदान ठरेल.
६-७ लसणाच्या पाकळ्या, २-३ ताजे आवळे, १ छोटा चिरलेला कांदा, ३ चमचे एरंडेल तेल, ४ चमचे नारळाचे तेल
एका बाऊलमध्ये नारळ आणि एरंडेल तेल मिक्स करा. या मिश्रणात लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि आवळा मिसळून मंद आचेवर ५ मिनिटांसाठी ठेवा. गॅसवरुन हटवून मिश्रण बाजूला ठेवा. थंड झाल्यानंतर तेलाचा वापर सुरु करा.
या तेलाचा नियमित वापर केल्यास केसांचा गळणे कमी होईल तसेच नवे केस उगवण्यास सुरुवात होईल.