काखेतून दुर्गंध येत असल्यास हे उपाय करा

मुंबई : काखेतून येणारा दुर्गंध अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला लाज आणू शकतो.

Updated: Mar 9, 2016, 08:19 PM IST
काखेतून दुर्गंध येत असल्यास हे उपाय करा  title=

मुंबई : काखेतून येणारा दुर्गंध अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला लाज आणू शकतो. त्यापासून वाचण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. रोज अनेकदा आंघोळ करुनही यात काही फारसा फरक पडत नाही. पण, मग ही दुर्गंधी थांबवायची कशी?

१)  तुम्ही दररोज अनेकदा आंघोळ केली तरी ही दु्र्गंधी कमी होण्याची तितकीशी शक्यता नसते. कारण, या दुर्गंधीचा तुमच्या आंघोळीशी फारसा संबंध नसतो. तर तज्ज्ञांच्या मते या दुर्गंधीचा थेट संबंध तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयीशी असतो. 

२) तुम्ही भरपूर कांदा लसूण खात असाल तर ते कमी करा. कारण, कांदा आणि लसूण यातील काही घटक हे ही दुर्गंधी उत्पन्न करण्यासाठी जबाबदार असतात. भरपूर जीवनसत्व असणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. 

३)  तुम्हाला कॉफी पिण्याची जास्त सवय असेल तर ती लगेचच थांबवा. कारण, घामाला एक विशिष्ट प्रकारचा दर्प देण्यास कॅफेन मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. 

४)  तुम्हाला खूप घाम येत असल्यास काखेत लावण्यासाठी मिळणारी लोशन वापरा. त्यामुळे घाम कमी येईल. पण, तुम्ही जर डिओड्रंट वापरणार असाल तर मात्र त्यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळेल. डिओड्रंट घाम कमी येण्यास मदत करत नाहीत, तर केवळ घामाचा दर्प मिटवतात. 

५) दिवसातून किमान दोन वेळा आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर आपल्या काखेत टाल्कम पावडर लावा. 

६) शक्य तितके जास्त सुती कपडे वापरा. सुती कपडे घाम कमी आणतात आणि आलेला घाम शोषून घेतात. 

७)  तुमच्या काखेत केस वाढले असल्यास त्यात घाम जमा होऊन जीवाणूंची निर्मिती होते. त्याचे रुपांतर पुढे घामाचा दर्प येण्यात होते. त्यामुळे काही दिवसांच्या अंतराने नियमीतपणे तुमच्या काखा साफ करा.