www.24taas.com, नवी दिल्ली
देशात ५०० हुन अधिक स्वाईन फ्यूचे रूग्ण आढळले आहेत डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्वाइन फ्यूची साथ थंडीच्या दिवसात आढळून येते. गर्दी आसणाऱ्या ठिकाणी, ए.सी.आसणाऱ्या ठिकाणी या रोगाच्या जंतूंची प्रामुख्याने वाढ होते.
सध्याच्या काळात एच१एन१ या रोगाचा प्रदूर्भाव दिसून येत आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. त्याच प्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. त्यामुळे या रोगाला आळा घातला जाऊ शकतो.
‘ऑल इंडिया इंस्टियूट ऑफ मेडीकल सायन्स’चे डॉक्टर रणदिप गुलेरीया यांनी सांगितले की हा रोग प्रमुख्याने थंडी आसलेल्या ठिकाणांमध्ये स्वाईन फ्ल्यू मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आमेरिका, युरोपमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव आहे. डॉक्टर गुलेरया यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या देशात केवळ थंड वातावरणामुळे हा रोग होतो. पण भारतात हा रोग हिवाळ्यात तसंच भारताच्या दक्षिणेकडून वाहाणाऱ्या वाऱ्यांमुळे होतो.
गुलेरीयांनी स्पष्ट केलं की या रोगाचा डुक्करांशी काहीही संबंध नाही. डब्यु एच ओ आरोग्य संघटनेने ऑगस्ट २०१० मध्ये एच१ एन१ची साथ पूर्णतः संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं होतं. पण तज्ज्ञांच्या मते हा रोग पुढील काळात ऋतुचक्रानुसार होणाऱ्या साथीच्या रोगांप्रमाणेच लोकांमध्ये आढळून येईल.
डॉक्टरांनी म्हटलं आहे की साधारण तापाला घाबरुन जाऊ नये. त्यावर योग्य उपचार करुन घ्यावे. अपोलो हॉस्पिटलचे सल्लागार डॉक्टर सुरजीत चटर्जी यांनी सांगितलं, की वारंवार ताप येऊन श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्वरीत यावर उपचार करुन घेणं योग्य ठरेल.