मुंबई : शिफ्ट ड्युटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना केवळ हृदयविकाराचा व लठ्ठपणाचाच धोका संभवतो असे नाही, तर त्यांना तीव्र पक्षाघाताचाही होऊ शकतो असे संशोधनात समोर आले आहे.
मानवी शरीर दिवस आणि रात्रीला ‘सर्केडिअन रिदम्स’ या २४ तासांच्या चक्राने सरावलेले असते आणि त्याचे नियंत्रण अंतर्गत जैविक घडय़ाळाने होते. हे जैविक घड्याळ केव्हा झोपायचे, रोजच्या शारीरिक प्रक्रिया केव्हा करायच्या याचे संकेत आपल्या शरीराला देत असतात.
कशामुळे जाणवू शकतो पक्षाघाताचा धोका
रोजची उठण्याची आणि झोपण्याची वेळ, जेवण्याची वेळ यात सतत होत असण्याऱ्या बदलांमुळे शारीरिक घडय़ाळ गुंडाळले जाते (अनवाइंड) आणि त्यामुळे अशा व्यक्तींना त्यांचे २४ तासांचे नैसर्गिक चक्र कायम राखणे अवघड होते. या सगळ्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
शिफ्ट ड्युटीमुळे, कामाच्या तणावामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो. यामुळे पक्षाघाताचा धोका संभवू शकतो, असे अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम हेल्थ सायन्स सेंटर कॉलेज ऑफ मेडिसिनचे डेव्हिड अर्नेस्ट यांनी केलेल्या संशोधनात आढळलेय.