मुंबई : मेडिकल पत्रिकेनुसार ७ करोड मधुमेह रुग्णांसमवेत भारत हा जगातील मधुमेहग्रस्त असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांच्या मते तिळाचे तेल मधुमेह बरा करण्यास मदत करते. भारतात २०१४ आणि २०१५ मध्ये २० ते ७० या वयोगटात मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येते. ते क्रमश: ६.६८ आणि ६.९१ करोडच्या संखेत आहे.
केएनजी अॅग्रो फूडचे संचालक सिद्धार्थ गोयल यांनी असे सांगितले की, आपल्या देशात तिळाच्या तेलाचे उत्पादन मुबलक प्रमाणात आहे आणि त्याचा वापर मधुमेहाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी होऊ शकतो. जगात जवळजवळ ३० लाख टन तिळाचे ऊत्पादन होते त्यात भारताचाच वाटा ३० टक्के आहे. भारतात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांत तिळाचे ऊत्पादन होते. एकदा मधुमेह रुग्णांना तिळाच्या तेलाचे महत्व कळले की भारत देश मधुमेह मुक्त राष्ट्र होईल.
मधुमेह तज्ज्ञ डॉ. अमरदीप सचदेव यांनी सांगितले की तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि अन्य अॅटीऑक्सिडेंट्स असतात जे मधुमेह आणि ज्या मधुमेह रुग्णांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील ते बरे करण्यास मदत होते. तिळाचे तेल रक्तामध्ये जाऊन ग्लुकोजची, कोलेस्ट्रॅालची पातळी कमी करुन मधुमेहाने होणाऱ्या अथेरोस्क्लेरोसिस आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर प्रतिबंध आणते.