जपानी महिलांच्या सुंदरतेचं हे आहे रहस्य

जगात वेगवेगळ्या रंग-रुपाचे लोक पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृती, चाली-रिती, राहणीमान हे वेगवेगळं असतं. जपान हे देखील एका वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. जपानच्या महिला देखील त्यांच्या सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत. जगभरात जपानच्या महिला त्यांच्या सुंदरतेमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात.

Updated: Sep 7, 2016, 11:52 AM IST
जपानी महिलांच्या सुंदरतेचं हे आहे रहस्य title=

मुंबई : जगात वेगवेगळ्या रंग-रुपाचे लोक पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृती, चाली-रिती, राहणीमान हे वेगवेगळं असतं. जपान हे देखील एका वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. जपानच्या महिला देखील त्यांच्या सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत. जगभरात जपानच्या महिला त्यांच्या सुंदरतेमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात.

प्रत्येक जपानी महिला आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याच वस्तूंचा वापर करत नाहीत. पाहा मग काय आहे त्यांच्या सुंदरतेचं रहस्य.
 
जपानी महिलांच्या सुंदरतेचं रहस्य आहे त्यांचा आहार. जपानी महिला मोठ्या प्रमाणात फळ, हिरव्या भाज्या, मासे खातात. यांच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट, विटामिन ई आणि ओमेगा-३ मिळतं. ज्यामुळे त्यांची स्किनवर देखील नॅचरल ग्लो येतो. 

जपानी महिला रोज एक खास प्रकारचं नॅचरल ऑईल वापरतात. ज्यामुळे त्यांची स्किन मॉस्चराईज राहते. यासाठी ते रोज अॅसेंशियल ऑईल जसं की, चंदनाचं तेल आणि लेवेंडर ऑईलने बॉडी मसाज करतात.

जपानी महिला लोशन मास्क नामक एक टोनरचा देखील वापर करतात. यामुळे त्याच्या स्किनला सुरकत्या नाही पडत. कापूस किंवा कॉटनच्या कपड्याने हे लोशन चेहऱ्याला लावतात. त्यानंतर कमीत कमी १० मिनिटं चेहरा झाकून ठेवा.