मासिक पाळी ठरवते स्त्रियांचं आरोग्य

महिलांच्या मासिक पाळीचा त्यांच्या आरोग्याशी अगदी जवळचा संबध आहे. मासिक पाळी त्यांना ज्या वयात येते त्यावरच त्यांची हेल्थ अवलंबून असते.

Updated: Dec 21, 2014, 09:04 PM IST
मासिक पाळी ठरवते स्त्रियांचं आरोग्य title=

नवी दिल्ली : महिलांच्या मासिक पाळीचा त्यांच्या आरोग्याशी अगदी जवळचा संबध आहे. मासिक पाळी त्यांना ज्या वयात येते त्यावरच त्यांची हेल्थ अवलंबून असते.

डेलीमेल या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका शोधात असं सांगितलं आहे की, मासिक पाळी कोणत्या वयात येते त्यावरून त्या महिलेला हृदय विकाराचे त्रास कितपत आणि कोणत्या वयात बळाऊ शकतात हे स्पष्ट होते.

युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. यामध्ये त्यांनी  सांगितले आहे की ज्या महिलांना 10 वर्षापेक्षा कमी वयात आणि 17 वर्षापेक्षा जास्त वयात मासिक पाळी येते त्यांना हृदय विकाराचा झटका, हाय ब्लड प्रेशर सारख्या विकारांना सामोरे जावे लागते.

तसेच ज्यांना 13 वर्षात मासिक पाळी येते त्यांना ह्द्याच्या त्रासाचा धोका कमी असतो. हा संपूर्ण शोध 50 ते 64 वर्षांच्या महिलांसोबत केला गेला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.